सुचले काही शब्द, कविता लिहवयास
मांडायला गेलो तर झाला जीव उदास
नको होऊ उदास, भर शब्दान मधे आनंद
समजवले जीवस, तर सुरू केला त्याने आठवणीचा छंद
क्षणसाधून जीवने मारली झेप त्रिकाली
उकरुन-उकरुन काढल्या तिच्या आठवणी
दिसतास तिचे मोहक आनन समोर
खेचून आणले मी जीवास विलक्षणा बाहेर
विसरलो ते आठावलेले शब्द, कविता लिहवायचे
डोळ्याण समोर होते फ्क्त जग आठ दिशानचे
जीवने खाला गोंधलाचा बेदम मार
तितक्यात दिसली एक मुलगी सुंदर फार
जीव हरपून केला सुंदरतेच्या प्रतिबींबास पाहून
तितक्यात आला प्रियकर तिचा मोटारगाडीत वाहून
चंचल जीवाने केले तोंड लहान
पण मित्रांची साथ येताच वाटला अभिमान
- प्रसन्न