Thursday, June 25, 2009

Kavita

Thursday, June 11, 2009

ऑफिस मधली दुपार

सकाळ पासून वाट पाहणारा डब्बा केला मी फस्त
रोज दुपारी ऑफिस मध्ये येई झोप मस्त

ओले होतात डोळे, जांभळ्या देऊन देऊन
घ्यावी एक डुलकी तर साहेब बघतो दुनकून

ऑफिस मधली दुपार, बंद पाडते नैसर्गिक घडयाळ
डोळे उघडून प्रभावी, होतात मानसिक हाल

दुबवून काढला चेहरा, पण झोप उडत नाही
काय करावे दुपारचे काहीच सुचत नाही

मी खुर्ची मध्ये, आणि वेळ पुढे-पुढे सरकत जाते
वेळेची गती, आणि माझी बुद्धिमती संत होत जाते

अखंड काळाचे असतात एक ते तीन चे दोन तास
आणि मग कटिंग मारून संपतो दुपारचा वनवास

Monday, June 08, 2009

परदेशभ्रम

आता गेलाच आहेस तर ये राहून 
वेळ आली कि ये निघून 

हौशिपोटी म्हण कि पैसापोटी म्हण 
होती तुझ्या मनात तिकडे जायची इच्छा भकम 

चित्र होते मनात तुझ्या , दूरचित्रवाणी वर पाहिलेले 
पण चित्रात आणि अस्तित्वात होते गुपित दडलेले 

दिसला तुला Burger ठेवा आठवला वडा-पाव 
मन मारून खायची मग सवय लाव 

जायचे कुठे फिरायला, तर आधी weather.com बघ 
असेल बाहेर पाऊस, तर पुरव इंग्रजी मालिका बघण्याची हौस 

असतात रस्ते मस्त, एक खडा त्यात नाही 
पण चिखल उडवायची हौस काही पूर्ण होत नाही 

असतील लोक सगळी कडे, पण चेहरे आपले नाही 
आपलेसे म्हणावे असे कुणीच दिसणार नाही 

मला दिसतोस तू, तुला दिसतो आम्ही 
पण webcam शिवाय हे मुळीच शक्य नाही 

जातील दिवस, जाईल वेळ 
मग येईल तुझी घरी जायची वेळ 

उडेल झोप, जेव्हा असेल दुसऱ्या दिवशी भरारी 
सामान भरून एकदाचे होशील तू परदेशातून फरारी 

Thursday, June 04, 2009

रुपांतर

सकाळ झाली, पण डोळे उघडे ना 
ऑफिसआत आलो, पण काम कर्वे ना 

असतो बसलेलो ह्या संगणका समोर दिवस भर 
मन भटकत असते, भवितव्याच्या पंखान वर 

मनाची स्वप्न असतात मनालीच्या डोंगरावर 
पण अस्तित्व रेंगाळत असते साहेबाच्या पायावर 

उसळेते रक्त आणि मनाचा होतो सुपर म्यान 
साहेबा समोर व्हावे लागते दोबर म्यान 

जणू विलक्षण खेळ आयुष्य जगायचा 
आठवड्यातील पाच दिवस रोज मरायचा 

काढावे लागतात सोमवार ते शुक्रवार पोटा पाई 
कधी जातात निघून शनिवार-रविवार काही उमगत नाही 

पुन्हा सुरु होते चक्र ते सकाळचे 
प्रभावी उघडावे लागतात डोळे सोमवार चे 
पुन्हा तोच संगणक आणि तोच साहेब 
असतात तेच पाच दिवस 
आणि झुलावे लागते करत आयुशाची सर्कस 

किती ही नकारात्मक कविता 
जणू आयुष्याचीच सोबती 
भरुया रंग जरा आयुष्यात अपुल्या गीतांनी 

केला छंद चालू खेळण्याचा सोमवारी 
आपोआप उघडतात डोळे सोमवारी सकाळी 

संगणका वर बसून रचल्या काही ओळी 
दोबर म्यान चा पत्ता घातला साहेबाच्या गळी 

मनाच्या मनालीत बांधला मोठा बंगला 
आयुष्य रंगवायचा छंद जणू रमला 

- प्रसन्न