मुहूर्त होता अतुल-अर्चना च्या लग्न चा.... आणि लग्न होते कारंजाला
बुधवार चे काम आटपून मी, तुषार, भूसारींचा अविनाश, बारींचा अविनाश आणि बारींची शितल संध्याकाळच्या चिंतामणी वोल्वो ने करंजाच्या प्रवासाला सुरुवात केली...
भूसारींची शितल हि आधीच नवरी म्हणजे अर्चना सोबत पुढे गेली होती....
पिकनिक सारखा वाटणारा प्रवास सुरु झाला आणि त्या सोबत तुषार ला मलमल पण सुरु झाली, जेह्वा गाडी थांबली तेव्हा तुषार ने त्याची अन्न-नलिका मोकळी करून घेतली.
सकाळी ६ च्या सुमारास आम्ही कारंजा मध्ये पोहचलो व एक रिक्ष्यात १० रुपये पर सीतच्या भाद्ण्याने आम्ही गोविंद मंगल कार्यालयाच्या प्रवेश द्वारा पाशी विराजमान झालो
आमच्या अपेक्षेच्या विपरीत, करायला मध्ये प्रथम येणारे आम्हीच होतो व त्याच्या बराच फायदा आम्हाला झाला, निवांत पणे आम्ही आवरून तयार झालो.
रात्रीच्या प्रवास मध्ये कमी खाल्या मुले आम्हाला प्रचंड भूक लागली होती व आमच्या भुकेची तृप्ती करण्या करता आम्ही स्वारी कारय्लाच्या बाहेर काढली. बिस्कीट आणि चहा पिऊन पोटाला बराच आधार मिळाला
थोड्याच वेळात नवरीचे स्वागत आम्ही तुताऱ्या व तोफा उधळून केले. नवरी सोबत भूसारींची शितल पण आली. हळू-हळू थोड्याच वेळात कार्यालय लोकांनी भरून गेले. किमान १०००० व्यात च्या स्पीकर ने वातावरण संगीतमय झाले होते.
अतुल चांडक हेय आपले अश्वपथक घेऊन ९:३० च्या सुमारास कार्यालयात येऊन पोहचले. नवरी कडच्या मंडळींनी वऱ्हाडाचे मनपूर्वक स्वागत केले. सर्व लोकां मध्ये आपले तुषार ह्य्ना नवरी कडचे लोक मुला कडचे व मुला कडचे लोक नवरी कडचे समजत होते व तुषार राव शःखुशीने दोन्ही जबाबदार्या पार पडत होते....
साकरपुडा उरकून मग अतुल ची वरात घोड्यावर रवाना झाली, वरात मध्ये जोरदार फाटक्या च्या आवाजात आणि बेभान होऊन नाचणाऱ्या लोकां बरोबर हनुमानाचे दर्शन घेऊन परत कार्यालयात विराजमान झाली
मंगलाष्टकांच्या साक्षीने अतुल-अर्चना ह्यांनी एक-मेकांच्या गळ्यात फुलांच्या मला घालून त्यांच्या आयुष्यातल्या दाम्पत्य जीवनास सुरुवात केली. जेवांची वेवस्ता केलेल्या ठिकाणी लोकांची गर्दी जमली आणि आम्हीही त्याच गर्दी मध्ये सामावून लग्नाच्या जेवणाचा परिपूर्ण आनंद लुटला... थोड्याच वेळात जोरदार पाऊसाने येऊन आपले आशीर्वाद नवीन जोडप्याला दिले. जसा पाऊसाने आपला वेग कमी केला, त्या संधीचा फायदा घेऊन आम्ही कारंजा च्या एस. टी स्तानाकावर यवतमाळ च्या गाडीची वात पाहण्यास सुरुवात केली (जाना पडेगा भाई, यवतमाळ जाना पडेगा). शेगाव हून आलेल्या लाल डब्यात मी आणि तुषार ने मिळून शेवटच्या बाकावरच्या ६ सीत पकडल्या व बसल्या जागी उद्या मारून मारून २ तसा मध्ये यवतमाळ वर आमचे चरणस्पर्श केले
तुषार-शितल चे बाबा आम्हाला रीसीव करायला सुमो घेऊन आले होते, ५ मिनिट मध्ये आम्ही घरी पोहचलो. काकुनी व त्याच्या सोबत डौली ने आवर्जून आमचे स्वागत केले. प्रचंड थकवा असल्या मुले आम्ही जेवण करून लवकर झोपायला गेलो. पण एखादा खेळ खेळ्या शिवाय झोप कशी येणार म्हणून आम्ही सिनेमा च्या नावाच्या भेंड्या खेळायला सुरुवात केली..... नेहरा द बोलर ... ह्या काल्पनिक सिनेमाच्या नावावर जोरदार हसून आम्ही निद्रनिस्त झालो....
सकाळी ६ वाजता जेव्हा मला जाग आली तेव्हा, बरींची शितल मोठे डोळे करून इकडे-तिकडे टकामका बघत पडली होती... थोड्याच वेळात शितल खाली जायला निघाली.... आमची गड-बड ऐकून तुषार हि जागा झला, मी आणि तुषार दर पाशी उभे असताना, जिन्या कडून धाप-धाप जोरात धावत येणाऱ्या शितल कडे व तिच्या मागून येणाऱ्या डौली ला पाहून सकाळी-सकाळी आम्हाला हसण्याचा पार फुटला दौलीचा आवाज आईकून भूसारींचा अविनाश पण बाहेर येऊन डौली बरोबर बराच वेळ हाना-मारी करत होता...
डंब चारादेस खेळत-खेळत सोबत पत्यांचा खेळ ह्यांच्या सोबत कधी वेळ निघून गेला काही कळलेच नाही. दुपारचा पाहुणचार करून पुन्हा आम्ही पत्यामध्ये गुंग झालो, उंबरकर भावंडानी माग आम्हाला यवतमाळ दर्शन करून दिले व परतीच्या प्रवासात आमची सोबत भूसारींची शितल आणि मोनी ह्या दोघींची साथ मिळून आम्ही ७ जणांनी संद्याकाळची ७ ची स्लीपर पकडून आम्ही यवतमाळ सोडले.. भूसारींच्या अविनाश च्या मोबिले मधला तौरच चालू करून, व कुशलतेने रुमालात बधून आम्ही त्या प्रकाशात पुन्हा पत्ते खेळले.... थोड्याच वेळात तुषारने पुन्हा एकदा बस थांबवून त्याची अन्न-नलिका मोकळी करून घेतली.... रात्रीचे जेवण उरकून आणि थोड्या वेळ पुन्हा पत्ते खेळून सगळे जन गाडीत झोपी गेले... व सकाळी एकाच रिक्ष्यात ४ जन बसून आम्ही घरी आलो व अश्या प्रकारे आमच्या विधार्भा प्रवासाची सांगता झाली