Tuesday, July 07, 2009

रुमाल....

समज-गैरसमज हे एक-मेकांचे सोबती....
येतात थेट चालून मनाच्या दाराशी....

नकळत-कळत जपतो मी त्यांना...
विसरून जातो मनाच्या भावना...

सुपीक मनात उगवला द्वेष....
माझ्या बोह्ती ओढली मी गुर्मीची रेष....

देहभिमानाची झळ बसे आपल्यांना....
वाटा मोकळ्या केल्या ढकलून सगळ्यांना....

वाढत होती उंची गर्विष्ठेची....
पण दुरावत होती माया मनातली...

हासील जरी केले मी मोहमाल...
गमावून बसलो मी अश्रू मुरणारा रुमाल....

- प्रसन्न

No comments: