Tuesday, July 07, 2009

शेवटची कविता

करता सुरवात....
अंतहि असतो निशित
येऊन जन्मास...
मरणेच असते अटल...

निसर्गाला सुद्धा असते मर्यादा...
निर्मितीचे चक्र चालवायला....

असेल कसा मी अपवाद...
असीम काव्य रचायला....

- प्रसन्न

रुमाल....

समज-गैरसमज हे एक-मेकांचे सोबती....
येतात थेट चालून मनाच्या दाराशी....

नकळत-कळत जपतो मी त्यांना...
विसरून जातो मनाच्या भावना...

सुपीक मनात उगवला द्वेष....
माझ्या बोह्ती ओढली मी गुर्मीची रेष....

देहभिमानाची झळ बसे आपल्यांना....
वाटा मोकळ्या केल्या ढकलून सगळ्यांना....

वाढत होती उंची गर्विष्ठेची....
पण दुरावत होती माया मनातली...

हासील जरी केले मी मोहमाल...
गमावून बसलो मी अश्रू मुरणारा रुमाल....

- प्रसन्न

Monday, July 06, 2009

जीवन

लहनाचा झालो मोठा
पण लहानपण गेले नाही

कितेकिंच्या प्रेमात पडलो
पण प्रेम मिळाले नाही

शिक्षणासाठी होते गुण
पण प्रवेश मिळाला नाही

नौकरीला लागलो
पण बढती मिळाली नाही

आयुष्य मध्ये जे इच्छिले
ते मिळाले नाही

स्वस्त बसायला सुधा
वेळ मिळाला नाही

कंटाळा आला न मिळण्याचा
कंटाळा आला काम करण्याचा
आत्ता कंटाळाच आला आयुष्य जगण्याचा

ओंढ लागली मारण्याची
म्हणून एक दिवस...
एक दिवस घेतली फाशी

अधीर झाला जीव स्वसासाठी
पण कसत गेला फास गळ्या बोह्ती

जगण्याच्या इच्छे ने काढला फना वर
पण मोहून गेला मृत्युच्या पुंगी वर

न मिळण्याच्या भ्रमासाठी
जीवांची केली मी नापीक माती

- प्रसन्न

Friday, July 03, 2009

अतुल-अर्चना शुभविवाह

मुहूर्त होता अतुल-अर्चना च्या लग्न चा.... आणि लग्न होते कारंजाला
बुधवार चे काम आटपून मी, तुषार, भूसारींचा अविनाश, बारींचा अविनाश आणि बारींची शितल संध्याकाळच्या चिंतामणी वोल्वो ने करंजाच्या प्रवासाला सुरुवात केली...
भूसारींची शितल हि आधीच नवरी म्हणजे अर्चना सोबत पुढे गेली होती....
पिकनिक सारखा वाटणारा प्रवास सुरु झाला आणि त्या सोबत तुषार ला मलमल पण सुरु झाली, जेह्वा गाडी थांबली तेव्हा तुषार ने त्याची अन्न-नलिका मोकळी करून घेतली.

सकाळी ६ च्या सुमारास आम्ही कारंजा मध्ये पोहचलो व एक रिक्ष्यात १० रुपये पर सीतच्या भाद्ण्याने आम्ही गोविंद मंगल कार्यालयाच्या प्रवेश द्वारा पाशी विराजमान झालो
आमच्या अपेक्षेच्या विपरीत, करायला मध्ये प्रथम येणारे आम्हीच होतो व त्याच्या बराच फायदा आम्हाला झाला, निवांत पणे आम्ही आवरून तयार झालो.
रात्रीच्या प्रवास मध्ये कमी खाल्या मुले आम्हाला प्रचंड भूक लागली होती व आमच्या भुकेची तृप्ती करण्या करता आम्ही स्वारी कारय्लाच्या बाहेर काढली. बिस्कीट आणि चहा पिऊन पोटाला बराच आधार मिळाला
थोड्याच वेळात नवरीचे स्वागत आम्ही तुताऱ्या व तोफा उधळून केले. नवरी सोबत भूसारींची शितल पण आली. हळू-हळू थोड्याच वेळात कार्यालय लोकांनी भरून गेले. किमान १०००० व्यात च्या स्पीकर ने वातावरण संगीतमय झाले होते.

अतुल चांडक हेय आपले अश्वपथक घेऊन ९:३० च्या सुमारास कार्यालयात येऊन पोहचले. नवरी कडच्या मंडळींनी वऱ्हाडाचे मनपूर्वक स्वागत केले. सर्व लोकां मध्ये आपले तुषार ह्य्ना नवरी कडचे लोक मुला कडचे व मुला कडचे लोक नवरी कडचे समजत होते व तुषार राव शःखुशीने दोन्ही जबाबदार्या पार पडत होते....

साकरपुडा उरकून मग अतुल ची वरात घोड्यावर रवाना झाली, वरात मध्ये जोरदार फाटक्या च्या आवाजात आणि बेभान होऊन नाचणाऱ्या लोकां बरोबर हनुमानाचे दर्शन घेऊन परत कार्यालयात विराजमान झाली

मंगलाष्टकांच्या साक्षीने अतुल-अर्चना ह्यांनी एक-मेकांच्या गळ्यात फुलांच्या मला घालून त्यांच्या आयुष्यातल्या दाम्पत्य जीवनास सुरुवात केली. जेवांची वेवस्ता केलेल्या ठिकाणी लोकांची गर्दी जमली आणि आम्हीही त्याच गर्दी मध्ये सामावून लग्नाच्या जेवणाचा परिपूर्ण आनंद लुटला... थोड्याच वेळात जोरदार पाऊसाने येऊन आपले आशीर्वाद नवीन जोडप्याला दिले. जसा पाऊसाने आपला वेग कमी केला, त्या संधीचा फायदा घेऊन आम्ही कारंजा च्या एस. टी स्तानाकावर यवतमाळ च्या गाडीची वात पाहण्यास सुरुवात केली (जाना पडेगा भाई, यवतमाळ जाना पडेगा). शेगाव हून आलेल्या लाल डब्यात मी आणि तुषार ने मिळून शेवटच्या बाकावरच्या ६ सीत पकडल्या व बसल्या जागी उद्या मारून मारून २ तसा मध्ये यवतमाळ वर आमचे चरणस्पर्श केले

तुषार-शितल चे बाबा आम्हाला रीसीव करायला सुमो घेऊन आले होते, ५ मिनिट मध्ये आम्ही घरी पोहचलो. काकुनी व त्याच्या सोबत डौली ने आवर्जून आमचे स्वागत केले. प्रचंड थकवा असल्या मुले आम्ही जेवण करून लवकर झोपायला गेलो. पण एखादा खेळ खेळ्या शिवाय झोप कशी येणार म्हणून आम्ही सिनेमा च्या नावाच्या भेंड्या खेळायला सुरुवात केली..... नेहरा द बोलर ... ह्या काल्पनिक सिनेमाच्या नावावर जोरदार हसून आम्ही निद्रनिस्त झालो....

सकाळी ६ वाजता जेव्हा मला जाग आली तेव्हा, बरींची शितल मोठे डोळे करून इकडे-तिकडे टकामका बघत पडली होती... थोड्याच वेळात शितल खाली जायला निघाली.... आमची गड-बड ऐकून तुषार हि जागा झला, मी आणि तुषार दर पाशी उभे असताना, जिन्या कडून धाप-धाप जोरात धावत येणाऱ्या शितल कडे व तिच्या मागून येणाऱ्या डौली ला पाहून सकाळी-सकाळी आम्हाला हसण्याचा पार फुटला दौलीचा आवाज आईकून भूसारींचा अविनाश पण बाहेर येऊन डौली बरोबर बराच वेळ हाना-मारी करत होता...

डंब चारादेस खेळत-खेळत सोबत पत्यांचा खेळ ह्यांच्या सोबत कधी वेळ निघून गेला काही कळलेच नाही. दुपारचा पाहुणचार करून पुन्हा आम्ही पत्यामध्ये गुंग झालो, उंबरकर भावंडानी माग आम्हाला यवतमाळ दर्शन करून दिले व परतीच्या प्रवासात आमची सोबत भूसारींची शितल आणि मोनी ह्या दोघींची साथ मिळून आम्ही ७ जणांनी संद्याकाळची ७ ची स्लीपर पकडून आम्ही यवतमाळ सोडले.. भूसारींच्या अविनाश च्या मोबिले मधला तौरच चालू करून, व कुशलतेने रुमालात बधून आम्ही त्या प्रकाशात पुन्हा पत्ते खेळले.... थोड्याच वेळात तुषारने पुन्हा एकदा बस थांबवून त्याची अन्न-नलिका मोकळी करून घेतली.... रात्रीचे जेवण उरकून आणि थोड्या वेळ पुन्हा पत्ते खेळून सगळे जन गाडीत झोपी गेले... व सकाळी एकाच रिक्ष्यात ४ जन बसून आम्ही घरी आलो व अश्या प्रकारे आमच्या विधार्भा प्रवासाची सांगता झाली

Thursday, June 25, 2009

Kavita

Thursday, June 11, 2009

ऑफिस मधली दुपार

सकाळ पासून वाट पाहणारा डब्बा केला मी फस्त
रोज दुपारी ऑफिस मध्ये येई झोप मस्त

ओले होतात डोळे, जांभळ्या देऊन देऊन
घ्यावी एक डुलकी तर साहेब बघतो दुनकून

ऑफिस मधली दुपार, बंद पाडते नैसर्गिक घडयाळ
डोळे उघडून प्रभावी, होतात मानसिक हाल

दुबवून काढला चेहरा, पण झोप उडत नाही
काय करावे दुपारचे काहीच सुचत नाही

मी खुर्ची मध्ये, आणि वेळ पुढे-पुढे सरकत जाते
वेळेची गती, आणि माझी बुद्धिमती संत होत जाते

अखंड काळाचे असतात एक ते तीन चे दोन तास
आणि मग कटिंग मारून संपतो दुपारचा वनवास

Monday, June 08, 2009

परदेशभ्रम

आता गेलाच आहेस तर ये राहून 
वेळ आली कि ये निघून 

हौशिपोटी म्हण कि पैसापोटी म्हण 
होती तुझ्या मनात तिकडे जायची इच्छा भकम 

चित्र होते मनात तुझ्या , दूरचित्रवाणी वर पाहिलेले 
पण चित्रात आणि अस्तित्वात होते गुपित दडलेले 

दिसला तुला Burger ठेवा आठवला वडा-पाव 
मन मारून खायची मग सवय लाव 

जायचे कुठे फिरायला, तर आधी weather.com बघ 
असेल बाहेर पाऊस, तर पुरव इंग्रजी मालिका बघण्याची हौस 

असतात रस्ते मस्त, एक खडा त्यात नाही 
पण चिखल उडवायची हौस काही पूर्ण होत नाही 

असतील लोक सगळी कडे, पण चेहरे आपले नाही 
आपलेसे म्हणावे असे कुणीच दिसणार नाही 

मला दिसतोस तू, तुला दिसतो आम्ही 
पण webcam शिवाय हे मुळीच शक्य नाही 

जातील दिवस, जाईल वेळ 
मग येईल तुझी घरी जायची वेळ 

उडेल झोप, जेव्हा असेल दुसऱ्या दिवशी भरारी 
सामान भरून एकदाचे होशील तू परदेशातून फरारी 

Thursday, June 04, 2009

रुपांतर

सकाळ झाली, पण डोळे उघडे ना 
ऑफिसआत आलो, पण काम कर्वे ना 

असतो बसलेलो ह्या संगणका समोर दिवस भर 
मन भटकत असते, भवितव्याच्या पंखान वर 

मनाची स्वप्न असतात मनालीच्या डोंगरावर 
पण अस्तित्व रेंगाळत असते साहेबाच्या पायावर 

उसळेते रक्त आणि मनाचा होतो सुपर म्यान 
साहेबा समोर व्हावे लागते दोबर म्यान 

जणू विलक्षण खेळ आयुष्य जगायचा 
आठवड्यातील पाच दिवस रोज मरायचा 

काढावे लागतात सोमवार ते शुक्रवार पोटा पाई 
कधी जातात निघून शनिवार-रविवार काही उमगत नाही 

पुन्हा सुरु होते चक्र ते सकाळचे 
प्रभावी उघडावे लागतात डोळे सोमवार चे 
पुन्हा तोच संगणक आणि तोच साहेब 
असतात तेच पाच दिवस 
आणि झुलावे लागते करत आयुशाची सर्कस 

किती ही नकारात्मक कविता 
जणू आयुष्याचीच सोबती 
भरुया रंग जरा आयुष्यात अपुल्या गीतांनी 

केला छंद चालू खेळण्याचा सोमवारी 
आपोआप उघडतात डोळे सोमवारी सकाळी 

संगणका वर बसून रचल्या काही ओळी 
दोबर म्यान चा पत्ता घातला साहेबाच्या गळी 

मनाच्या मनालीत बांधला मोठा बंगला 
आयुष्य रंगवायचा छंद जणू रमला 

- प्रसन्न 

Monday, May 11, 2009

चंचल जीव

सुचले काही शब्द, कविता लिहवयास
मांडायला गेलो तर झाला जीव उदास

नको होऊ उदास, भर शब्दान मधे आनंद
समजवले जीवस, तर सुरू केला त्याने आठवणीचा छंद

क्षणसाधून जीवने मारली झेप त्रिकाली
उकरुन-उकरुन काढल्या तिच्या आठवणी

दिसतास तिचे मोहक आनन समोर
खेचून आणले मी जीवास विलक्षणा बाहेर

विसरलो ते आठावलेले शब्द, कविता लिहवायचे
डोळ्याण समोर होते फ्क्त जग आठ दिशानचे

जीवने खाला गोंधलाचा बेदम मार
तितक्यात दिसली एक मुलगी सुंदर फार

जीव हरपून केला सुंदरतेच्या प्रतिबींबास पाहून
तितक्यात आला प्रियकर तिचा मोटारगाडीत वाहून

चंचल जीवाने केले तोंड लहान
पण मित्रांची साथ येताच वाटला अभिमान

- प्रसन्न

ओढ


काळबाह्य होत नाही कधीच उन्हाळा
त्याच्या पाठोपाठ नेहमीच येतो मग पावसाळा

काढतात बराच वेळ दोघेही एक-मेका बिना
पण जेव्हा येतात संग आणतात सप्तरंगी वीणा

हवा-हावासा असतो तो इंद्र-धनुष्या मनास फार
पण क्षणभुनगार झळक्तो घालून मोत्यांचे हार

असता जर तो चिरस्तायि जर डोक्यावर
टिपले नसते डोळे त्याच्या प्रतिक्षेवर

ओढ लावतो आपल्याला पुन्हा वर पहिला
अदृश्या राहून शिकवतो वाट पाहून जगायला

Tuesday, April 07, 2009

आत्ता लक्षात आले माझ्या

प्लास्टिक ची पिशवी, हवा भरूनी पतंग सारखी उडवायचो आधी.....
आत्ता लक्षात आले माझ्या, आकाशात मोकळी हवाच उरली नाही......

झोप उडवायला , चहा प्ययचो रोज दुपारी......
आत्ता लक्षात आले माझ्या, कितेक  झाडे मेली चहा च्या कपपाई

एका जागी बसून शिकलो टीवी चालू-बंद करायला
आत्ता लक्षात आले माझ्या, का धेरी कमी होत नाही

ओफ्फिसेसातल्या विज़ेकडे लक्षा कधी मे दिले नाही.....
आत्ता लक्षात आले माझ्या, मध्यारात्री फंखा का फिरत नाही.....

वार्‍यासंग गप्पा मारायची सवय लावून घेतली आहे......
आत्ता लक्षात आले माझ्या, पेट्रोल का पुरत नाही....

ताटत भरून घेतले गच सगळे काही....
आत्ता लक्षात आले माझ्या, ऑस्कर मिळाले स्लम्डॉग ला कश्या पायी....

खेळता-खेळता उडवले विमान, कागदाचे मे खिडकी बाहेर....
आत्ता लाखत आले माझ्या, खिडकी बाहेर झाडे का दिसत नाही......

गुरफतले


एके काळी असायची कधी झाडावर हिरवी पान
तेव्हा बघायला मिळायची ती किलबिळणारी पाखर

दाटूण्यायचे काळे ढग, असा असायचा मेचा उन्हाळा...
पडायच्या जोरदार गारा, गरजायचे ढग दाखवून चंदेरी किनारा....

यायचा तो मातीचा वास पहिल्या सरी नंतर....
दिसायचे पक्ष्यांचे थवे सोनेरी क्षितिज़ावर.....

पण आत्ता.... पण आत्ता..... हिरवा रांग राहिला फ्क्त कागदावर....
पाखरनाचे देह दिसतात फ्क्त संग्रलायच्या भिंतींवर....

काळ्या ढघाने गुल्फतले आत्ता आकाश सारे.....
चेंदेरी किनारे झाले मृत्यूचे दारे

माती तर लपून बसली सेमेंट च्या खाली....
पक्ष्यांचे थवे तर इतिहासात जमा ज़ाळी....